Ad will apear here
Next
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये खारफुटी वन संवर्धन कार्यक्रम
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग ‘मँग्रुुव्ह सोसायटी ऑफ इंडिया’शी संलग्न असून, यामार्फत खारफुटीच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाने मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील आचरा या गावातील जामडूलवाडी येथे एकदिवसीय सहलीचे आयोजन केले होते.  

खारफुटीची वने ही खाडी भागात एका विशिष्ट अधिवासात वाढतात. त्यांची प्रजोत्पादनाची प्रक्रिया एका विशिष्ट मुकुलिकेच्या (शेंगेच्या) रूपात पूर्ण होत असते. दर वर्षी एप्रिल ते जून या काळात त्या मुकुलिका परिपक्व होऊन पाण्यात रुजून येतात. खारफुटीची वने हे विविध प्रकारच्या प्राणी, पक्षांचे निवासस्थान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ही वने निसर्गातील जैवविविधतेचे जतन करत आहेत. 

जामडूल वाडी भागातील खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटीची वने आहेत. तेथे स्थायिक असणारे प्रमोद वाडेकर हे निसर्गप्रेमी असून, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ते खारफुटीच्या वनांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. या एक दिवसीय सहलीमध्ये द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकणारे विद्यार्थी व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम, प्रा. अंबादास रोडगे, प्रा. मोहिनी बामणे व प्रा. मयुरेश देव सहभागी झाले होते. वाडेकर यांनी सर्व सहभागींना खारफुटीच्या विविध प्रजातींची माहिती व ओळख करून दिली; तसेच त्यांची रोपवाटिका तयार करण्यासाठी मार्गदर्शनही केले. 

या मार्गदर्शनाचा उपयोग करून अशा प्रकारची रोपवाटिका महाविद्यालयाच्या आवारात तयार करण्यासाठी आणि त्या रोपांची लागवड रत्नागिरीच्या खाडी परिसरातील ज्या भागामध्ये खारफुटींची संख्या कमी होत आहे, तेथे करण्यासाठी प्राणीशास्त्र विभाग प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZPVCB
Similar Posts
आता रत्नागिरीतही लुटा स्कूबा डायव्हिंगचा आनंद रत्नागिरी : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून न्याहाळता येणार आहे.
रत्नागिरीत द्विजिल्हास्तरीय तबलावादन स्पर्धा रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पातळीवरील तबलावादन स्पर्धा १५ ऑक्टोबरला रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या वर्षी प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान प्रख्यात तबलावादक फजल कुरेशी, र्‍हिदम अ‍ॅरेंजर नितीन शंकर व राकेश परिहस्त यांची जुगलबंदी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे
रत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा रत्नागिरी : ‘भारतात बांबूपासून १८ हजार कोटी आर्थिक उलाढाल होते. व्हेपर ट्रिटमेंटद्वारे बांबूचे आयुष्य वाढवू शकतो. पर्यावरणपूरक घर बांधण्यासाठी बांबूचा उपयोग करावा. आता नव्या जमान्यात घरामध्ये बांबूच्या कलाकृती ठेवल्या जातात. सिलिंग व फ्लोअर टाइल्सही बसवल्या जात आहेत. बांबूपासून बायोडिझेल व वीज निर्मिती शक्य आहे
दांडी येथील महिलांना घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मालवण : दांडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील मच्छिमार महिलांना विविध प्रकारच्या घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language